अधिकारी महासंघाची गुरुवारी बैठकराजपत्रिक अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे- निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव
कोल्हापूर दि. 26 : अधिकारी महासंघाच्या अभ्यासपूर्ण मांडणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाच दिवसांचा आठवडा, मारहाण-दमबाजी सक्षम कायदा (5 वर्षे शिक्षेची तरतुद) इत्यादी शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आलेल्या आहेत. इतरही प्रलंबित मागण्याबाबत पाठपुरावा सुरु असून जुनी पेंशन योजनेची आवश्यकता, 2 लाख 50 हजार रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज व इतर मागण्याबाबत तसेच महासंघाच्या कल्याण केंद्र उभारणीसाठी निधी संकलनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी दुपारी 4 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबैठकीस अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व राजपत्रिक अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले आहे.
00 0 0 0 0
No comments