*बालिंगा गावची यात्रा 7,8,व 9 मे रोजी होणार*. *7 मे. रोजी ग्रामदैवत हजरत पीर मुसा जंगवली देवास गलेफ* *8 मे. यात्रेचा मुख्य दिवस रोजी विविध स्पर्धाचे आयोजन**9 मे. रोजी मुंबई, पुणे ( लावणी सुपरस्टार) सांस्कृतिक कार्यक्रम सादर...
बालिंगा /प्रतिनिधी. बालिंगा .ता.करवीर येथील ग्रामदैवत हजरत पीर मुसा जंगवली यांचा उरूस 7 मे ते 9 मे पर्यंत तीन दिवस भरणार आहे. अशी माहिती सरपंच मयूर मधुकर जांभळे,सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
गेली दोन वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे माणुसकी दुरावली गेली. आता संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना समूळ नष्ट झाला आहे. माणस माणसाजवळ येऊ लागली आहेत. यात्रा निमित्य ठेऊन माणुसकी जपण्यासाठी यात्रेचे आयोजन केले आहे. शासनाने दिलेल्या नियम व अटी नुसार यात्रा पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन बालिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments