Header Ads

Header ADS

*आज २८ एप्रिल २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात*




• डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी "सौर उर्जा कुंपणाचा" समावेश. 
(वन विभाग)

• देशातील पहिल्याच महाराष्ट्र जनुक कोष (Maharashtra Gene Bank) प्रकल्पास मान्यता
 (वन विभाग)

• येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदनिर्मिती (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)

• पोलीस अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकीय घरबांधणी अग्रिम देणार
  (गृह विभाग)

• विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आरक्षण व  सवलतींचा, इतर लाभांचा सर्वकष अभ्यास करुन  अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उप समितीच्या  शिफारशी. 
(इतर मागास बहुजन कल्याण) 

• गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील अतिरिक्त उस गाळप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलती वाहतूक उतारा व साखर उतारा घट अनुदान देण्यास मान्यता
 (सहकार विभाग)

अठरा तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना १००  टक्के अनुदान
( उच्च व तंत्रशिक्षण)

सामाजिक न्याय विभागाच्या चार महामंडळांची भागभांडवल मर्यादा वाढविली

(सामाजिक न्याय व विशेष सहा्य)

राज्यात विविध विभागांत रेडिएशन ओन्कोलॉजी युनिट, कॅथलॅब्स, शस्त्रक्रियागृहे, डायलिसिस यंत्रे स्थापन करणार

(सार्वजनिक आरोग्य)

No comments