घाटगे ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय वसंतराव घाटगे यांचा जन्मदिवस ९ मे. हाच दिवस घाटगे ग्रुप कंपन्यांमध्ये "फौंडर्स डे" म्हणून साजरा करण्यात येणार आहे
घाटगे ग्रुपचे संस्थापक आणि आमचे आजोबा स्वर्गीय वसंतराव घाटगे यांचा जन्मदिवस ९ मे. हाच दिवस घाटगे ग्रुप कंपन्यांमध्ये "फौंडर्स डे" म्हणून साजरा करण्यात येतो. अनंत अडचणींवर मात करत कै. वसंतराव घाटगे यांनी विलक्षण जिद्दीने घाटगे ग्रुप नावारूपाला आणला. वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली. ते नुसतेच उद्योग व्यवसाय करून थांबले नाहीत तर समाजातील गरजूंना मदत करण्यातही त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला..
कै. वसंतराव घाटगे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना मानवंदना देणे हा आजच्या "फौंडर्स डे" चा प्रमुख उद्देश. आजही आजोबांनी घालून दिलेल्या आदर्शांवर घाटगे ग्रुपमधील सर्व कंपन्या कार्यरत आहेत. भविष्यात घाटगे ग्रुपचा विस्तार करून व्यवसायाच्या उज्वल परंपरेसोबत समाजाभिमुख काम करण्याची ग्वाही आम्ही सर्व घाटगे कुटुंबीय यावेळी देत आहोत..
यानिमित्ताने घाटगे ग्रुप मधील सर्व कर्मचाऱ्यांची प्रभात फेरी आयोजित केली आहे. याशिवाय "फौंडर्स डे" च्या निमित्ताने घाटगे ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध संस्था, खेळाडू यांना मदत करण्याची परंपरा आहे. कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर आणि टेनिसपटू ऐश्वर्या जाधव आपल्या कर्तृत्वाने कोल्हापूरचं नाव देशात उज्वल करीत आहेत. आजच्या दिवशी घाटगे ग्रुपच्या वतीने या दोघींना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत. घाटगे ग्रुपचे हितचिंतक, सर्व व्हेंडर्स यांना मी आवाहन करतो की त्यांनी या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे.
No comments