Header Ads

Header ADS

शिष्यवृत्ती फॉर्म मोफत भरून देणार. .........संजय सुतार चाफोडीकर



         बालिंगे / प्रतिनिधी. 
  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम  कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळते. आणि ती मिळावी यासाठी  सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे  मत कोल्हापूर जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सुतार.( चाफोडीकर )यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 
   संजय सुतार यांचे बांधकाम कामगारांसाठी बांधलेले बांधकाम  कामगार भवन  हे उल्लेखनीय कार्य  कोल्हापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणारे आहे. 
   बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळते त्याचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतात. ते  भरणे बांधकाम कामगारांसाठी शक्य नाही म्हणून सर्व कामगारांनी आपल्या पाल्याचे कागदपत्रे पाडळी खुर्द येथील राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटना ऑफिसमध्ये जमा करावेत सर्व फॉर्म मोफत भरून देण्यात येणार आहेत. या संधीचा लाभ सर्व कामगारांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष संजय सुतार यांनी केले आहे.

No comments