Header Ads

Header ADS

*समाजीक हिताचे युवकांनी घेतलेले कार्य सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी* *युवक मंचच्या कामाची एक पुस्तिका काढावी इतके सुंदर काम* राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे गौरवोद्गार

        बी एच दादा युवक मंचचा आठवा वर्धापन दिन तसेच 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सलग सातव्या वर्षी सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्काराच्या वितरण समारंभ व युवक शेतकरी मेळावा प्रसंगी नामदार बाळासाहेब थोरात यांनी युवक मंचच्या कार्याचे केलेले कौतुक मंचच्या युवकांसाठी खूप  प्रेरणादाई होते.
मनोगत व्यक्त करताना त्यांनी अशा प्रकारच्या कामाची एखादी पुस्तिका काढावी जेणेकरून इतर तरुणांनाही त्याचा आदर्श घेता येईल तसेच समाज हितासाठी युवक मंच करत असलेली धडपड खूप कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले अध्यक्षस्थानी करवीरचे आमदार श्री पी एन पाटील साहेब होते.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार पी एन पाटील म्हणाले,या मंचने गावात कोणतीही व्यक्ती यशस्वी झाल्यावर त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात देऊन प्रेरणा देण्याचे काम केले आहे.  प्रचंड धाडसी काम करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. या तालुक्यात प्रत्येक गावात अशा प्रकारचे युवक मंच तयार करूण समाजासाठी प्रेरणादायी काम व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली याप्रसंगी सर्वच वक्त्यांनी युवक मंचच्या कार्याचे कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
       तसेच पुरस्कार प्राप्त महिला मधुरा महादेव नरके, शुभांगी पांडूरंग पाटील, अर्चना विश्वास बराले, वैशाली संदीप शेलार,   यांना सहकुटूंब शॉल आरोग्य मित्र शेवगा देऊन तसेच मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
  यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांच्यावतीने मधुरा नरके यांनी महिलांच्या कार्यपद्धतीवर पुरस्काराच्या माध्यमातून प्रकाश टाकणारे युवक मंच हा एकमेव ग्रुप असून त्यांनी दिलेली कौतुकाची थाप महिलांसाठी खूपच प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले .
 यावेळी  बी एच पाटील दादा सरपंच सचीन चौगले यांची मनोगते झालीत. कार्यक्रमाला गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जि प माजी अध्यक्ष राहूल पाटील राजेश पाटील माजी सभापती राजू सूर्यवंशी ,बाजीराव खाडे,   उदयसिंह पाटील, संदिप पाटील बबलू पाटील केवलसिंग रजपूत एम जी पाटील , श्रुतिका काटकर , एम बी किडगावकर वडणगे सेवा संस्था चेअरमन बी आर पाटील, व्हाईस चेअरमन रेखा बराले, महादेव पाटील युवराज साळोखे सतीश चेचर इत्यादी प्रमुख तसेच अनेक भागातील ग्रामस्थ उपस्थित होते 
सदरच्या समारंभास महिलांचीही उपस्थित लक्षणीय होती .
स्वागत व प्रास्ताविक युवा नेते रविंद्र पाटील यांनी केले , सूत्रसंचालन आर.बी. देवणे तर आभार निवास देवणे यांनी मानले.

No comments