Header Ads

Header ADS

*बालिंगे हायस्कूल,बालिंगेचा १००% निकाल



बालिंगा वार्ताहर: बालिंगे हायस्कूल बालिंगे चा मार्च २०२२ चा निकाल १००% लागला आहे. गुणवत्तापात्र विद्यार्थिनीमध्ये कु. पाटील आकांशा अशोक ९३.००% गुण मिळवून प्रथम , कु. साबळे सानिका कृष्णात ९१.८०% गुण मिळवून द्वितीय व कु.साबळे श्रावणी शरद ९१.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त करून शाळेचे नाव उज्वल केले आहे. गेली अनेक वर्षांची १००% निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी , मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. वसंतराव शामराव जांभळे, जॉ.सेक्रेटरी मा.श्री. मधुकर शामराव जांभळे, खजानिस मा.श्री अशोक श्रीपती घोडके, सदस्य मा.श्री. एम.एस.भवड व सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.पटवेगार एच.के सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

No comments