Header Ads

Header ADS

10 वी -12 वी नंतर पुढे काय ?



 

इयत्ता 10 वी व  12 वी चा निकाल जाहिर झाला. या  10 वी-12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता पुढे काय करायचेकोणत्या क्षेत्राकडे वळावेकाय निर्णय घ्यावायाबाबत खूपच संभ्रमावस्था असेल. काही पालक विद्यार्थ्यांवर दबाव आणत असतातआपल्या पाल्याने आपले अधुरे स्वप्न पूर्ण करावे किंवा आपल्या घरी अगोदरच जो व्यवसाय आहे तोच पुढे न्यावा किंवा इतर सर्वजण मोठ्या प्रमाणावर ज्या क्षेत्राकडे वळतात तोच मार्ग निवडावा किंवा किती गुण मिळालेत त्यानुसार साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर सायन्स; 50 टक्के ते 60 टक्के पर्यंत मिळाले तर कॉमर्सआणि 50 टक्के पेक्षा कमी मिळाले तर आर्ट्स शाखा. अशा पद्धतीने अगोदरच पूर्वीच्या परंपरेनुसार निर्णय घेतले जातात.

            वरील सर्व पर्याय चुकीचे आहेत असे नाही परंतु करिअरचे योग्य क्षेत्र निवडण्यासाठी केवळ हेच पर्याय डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय अचूक असेल असे सांगता येणार नाही तर करिअरचा योग्य पर्याय निवडण्यासाठी या पर्याया बरोबरच स्वतःची आवडक्षमताछंदमिळविलेले प्रावीण्यकौशल्य या गोष्टी विचारात घेऊनभविष्यातील संधी ओळखून मगच योग्य पर्यायाची निवड करावी. ही निवड करताना पालकशिक्षकसमुपदेशकइंटरनेटवृत्तपत्रेपुस्तके ही माध्यमे तसेच शासनाचे महा करियर पोर्टल किंवा महाराष्ट्र करियर ॲप तसेच त्या त्या संबंधित क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीउच्चशिक्षित नातेवाईक या सर्व घटकांकडून परिपूर्ण माहिती घ्यावी. संबंधित क्षेत्राचा अभ्यासक्रम पहावा त्यानंतरच सर्वांगाने विचार करून स्वतःसाठी योग्य असे करिअरचे क्षेत्र निवडावे.

      कोरोनाच्या महामारी नंतर करिअरच्या काही क्षेत्रांना खूप महत्त्व आले तर काही क्षेत्रे थोडी मागे पडली असे दिसत असतानाच पुन्हा एकदा करिअरची सर्वच क्षेत्रे नव्या जोमाने भरारी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनोएकंदरीतच अभ्यासक्रमाची प्रामुख्याने सात क्षेत्रांमध्ये विभागणी केलेली दिसून येते. ही सात क्षेत्रे म्हणजेच आर्टस्कॉमर्सअभियांत्रिकीवैद्यकीयकृषीललितकलागणवेशधारी सेवा ही आहेत.

आर्ट्स (कला) किंवा हयुमॅनिटीज् ही शाखा निवडताना ज्यांना भाषासमाजशास्त्रअर्थशास्त्रमानसशास्त्र,भूगोल या विषयांमध्ये रुची असेलवाचनाची आवड असेलसंवाद कौशल्य चांगले अशा विद्यार्थ्यांना या शाखेची निवड करण्यास हरकत नाही. वाणिज्य किंवा कॉमर्स शाखा निवडताना विद्यार्थ्यांना संख्या विषयक आवडव्यवसाय-व्यापार यांची आवड असेलबँकिंग,व्यवस्थापनअकाउंटिंग या विषयांमध्ये रुची असेल तर विद्यार्थी ही शाखा निवडू शकतो.

अभियांत्रिकी शाखेकडे वळायचे असल्यास विद्यार्थ्यांनी प्रथम अभियांत्रिकी मधील सर्व शाखांची माहिती घ्यावी. सध्या या क्षेत्रांमध्ये 60 पेक्षा जास्त उपशाखा निर्माण झालेल्या आहेत. स्वतःला यातील कोणती शाखा निवडायची आहे त्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

जे विद्यार्थी वैद्यकीय किंवा त्या संबंधित अभ्यासक्रम घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना बारावी सायन्स नंतर नीट प्रवेश परीक्षा देऊन मेडिकलच्या विविध कोर्सेसना प्रवेश घेता येतो. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज च्या अभ्यासक्रमांना सुद्धा नीट परीक्षा अनिवार्य आहे. औषधनिर्माणशास्त्रसंशोधन या क्षेत्रांकडे ही वळता येते.

            कृषी क्षेत्राकडे जाण्यासाठी बारावी सायन्स नंतर सीईटीजेईई,नीट या प्रवेश परीक्षेद्वारे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. कृषीशास्त्रामध्ये एकूण 23 उपशाखा आहेत. महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत त्या शिवाय काही खाजगी कृषी कॉलेजेस आहेत. या क्षेत्राच्या अधिक माहितीसाठी www.mcaer.org या संकेतस्थळाला भेट द्या.

            ललितकला म्हणजेच फाईन आर्ट्स. ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्टफॅशनगेम डिझाईनग्राफिक डिझाईनब्युटी अँड वेलनेससंगीतवेब डिझाईनिंग,नृत्य-नाट्य- अभिनयहोमसायन्सचित्रकला इ. सर्व प्रकारच्या कला या क्षेत्रामध्ये येतात.

            गणवेशधारी सेवा या क्षेत्रामध्ये आर्मीनेव्हीएअरफोर्सरेल्वे बोर्डखाजगी सुरक्षा व्यवस्थासंरक्षण उत्पादन क्षेत्रअशा विविध शाखांमध्ये शिक्षण घेता येते आर्मी (भूदल) या सेनादलात प्रवेशासाठी बारावी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. परंतु नेव्ही (नौदल) व एअरपोर्ट (वायुदल) या सेनादलात प्रवेशासाठी अकरावी व बारावी विज्ञान शाखेतून पी सी एम हा ग्रुप असणे आवश्यक असते.

            या क्षेत्रांबरोबरच क्रीडा,विधी (लॉ)अध्यापनकमवा व शिकाव्यावसायिक शिक्षणएमपीएससीयुपीएससीशारीरिक शिक्षण अशी विविध क्षेत्रे आहेत यांचाही विचार करावा.

भविष्यामध्ये टॉप 10 करिअरची क्षेत्रे म्हणून व्यावसायिक कलाकार (कमर्शियल आर्टिस्ट)आरोग्य सेवा (हेल्थ केअर) पर्यावरण पूरक सामाजिक कार्यकर्ते (इकोफ्रेंडली सोल्युशन्स) मशीन शिक्षणतज्ञ (मशिन लर्निंग) विधीतज्ञकायदेपंडित (लीगल ॲडव्हायझर)डेटा विज्ञान तज्ञ (डेटा सायन्स)मानसशास्त्र (सायकॉलॉजी)गेमिंग,कचरा व्यवस्थापन,(वेस्ट मॅनेजमेंट) आणि लीडरशिप (नेतृत्व) ही क्षेत्रे उदयोन्मुख करीयरची क्षेत्रे म्हणून सांगता येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाकोल्हापूर येथे संपर्क साधावा.

    सर्व दहावी-बारावीच्या  विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी व उज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

 

श्रीम.सरला अविनाश पाटील.

                                                                                                जिल्हा समुपदेशक,

                                                                                                जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,कोल्हापूर.

No comments