Header Ads

Header ADS

21 जुलै पासून 12 वी तर 27 जुलै पासून 10 वीची परीक्षाजिल्ह्यातून 12 वी साठी 52 तर 10 वी साठी 30 विद्यार्थी प्रविष्ठ होणार


सिंधुदुर्गनगरीदि19  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 जुलै 2022 तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 27 जुलै पासून सुरू होत आहे. जिल्ह्यात 12 वीसाठी 52 व 10 वी साठी 30 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्याअनुषंगाने आज जिल्हा दक्षता समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

            या बैठकीस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती तावशीकर, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता आर.पी.भोपळे,  परिवहन महामंडळाचे विभाग प्रमुख प्रकाश रसाळ, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांच्यासह संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            यावेळी शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी परीक्षांची माहिती देताना जिल्ह्यात 12 वीच्य परीक्षेसाठी 2 तर 10 वीच्या परीक्षेसाठी 2 परीक्षा केंद्र असल्याचे सांगितले. तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 2 भरारी पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती दिली. कणकवली येथील एस.एम. हायस्कूल हे 12 वी 10 वी साठीचे केंद्र आहे. तर सावंतवाडी येथे 12 वी साठी श्री पंचम खेमराज महाविद्यालय व 10 वी साठी कळसुलकर हायस्कूल येथे परीक्षा केंद्र आहेत. अतिविलंब शुल्क आकारून 10 वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारे विद्यार्थी दि. 25 जुलै 2022 रोजी पर्यंत फॉर्म भरू शकतात अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

            विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना देऊन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले, ज्या ठिकाणी पेपरच्या कस्टडीची सोय केली आहे. त्या ठिकाणांची विद्युत विभागांकडून तपासणी करण्यात यावी. परीक्षा केंद्रावरील सुविधांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तपासणी करण्यात यावी. वर्ग खोल्यांमध्ये पंखे, लाईटचे दिवे यांची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षित बैठक व्यवस्था यांचे नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

No comments