दि. १ जुलै ते ३० सप्टेंबर अखेर घरफाळयामध्ये ४ टक्के सवलत
कोल्हापूर ता.19 : महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून शहरातील मिळकत कर चालू मागणी एकरकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना दि. १ जुलै ते ३० सप्टेंबर अखेर घरफाळयामध्ये ४ टक्के सवलत योजन सुरु आहे. यामध्ये दि.१ एप्रिल ते १८ जुलै २०२२ अखेर रु.३० कोटी ७८ लाख ७९ हजार 836 इतका मालमत्ता कर मिळकतधारकांनी भरणा केला आहे. यामधील सुमारे १४,७९७ करदात्यांनी गुगल पे, फोन पे व इतर युपीआय वॉलेट सुविधेचा लाभ घेतला आहे. दि.१ एप्रिल ते ३० जून २०२२ रोजी अखेर ६ टक्के सवलत योजना होती. त्यास प्रतीसाद देत ४६,०६० करदात्यांनी एकूण रु.२६ कोटी ४२ लाख ३० हजार 121 इतका कर भरणा केला आहे. तसेच दि.१ ते १८ जुलै २०२२ अखेर ४ टक्के सवलत योजनेमध्ये एकूण १०,३८० करदात्यांनी रक्कम रु.४ कोटी ३६ लाख ४९ हजार 715 रक्कम जमा झाली आहे.
महानगरपालिकेच्यावतीने शहरातील सर्व मिळकतधारकांना पोस्ट ऑफीस मार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीची देयके लागु करण्यात आली आहेत. तथापी ज्या मिळकतधारकांस त्याचे देयक मिळाले नसेल तर शनिवार पेठ पोस्ट ऑफीस या ठिकाणी पुढील १५ दिवस देयके ठेवण्यात आली आहेत. त्या ठिकाणाहुन मिळकतधारकांनी आपली बीले उपलब्ध करुन घेवू शकतात. त्यानंतर सदरची सर्व वितरित न झालेली देयके ज्या त्या विभागिय कार्यालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत. तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी आपल्या कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे व करदात्यांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
No comments