Header Ads

Header ADS

27 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग


 
          कोल्हापूर, दि. 6  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली, शेणवडे, कळे व वेतवडे, धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व चिखली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 42.45 दलघमी, वारणा 353.03 दलघमी, दूधगंगा 219.65 दलघमी, कासारी 34.30 दलघमी, कडवी 26.10 दलघमी, कुंभी 35.01 दलघमी, पाटगाव 42.53 दलघमी, चिकोत्रा 19.76 दलघमी, चित्री 18.47 दलघमी, जंगमहट्टी 14.65 दलघमी, घटप्रभा  42.61 दलघमी, जांबरे 10.14 दलघमी, आंबेआहोळ 19.25, कोदे (ल.पा) 5.83 दलघमी असा आहे.
            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 30.4 फूट, सुर्वे 28.3 फूट, रुई 55.6 फूट, इचलकरंजी 53.6, तेरवाड 46 फूट, शिरोळ 35 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 19.1 फूट तर नजीकच्या सांगली 5.9 फूट व अंकली 11  फूट अशी आहे.
00000

No comments