Header Ads

Header ADS

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेवगालागवडीसाठी 30 जुलैपूर्वी अर्ज करावेत - पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण

 


कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवडीसाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 15 शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे दि. 30 जुलै पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे.

योजनेच्या अटी व शर्थी खालील प्रमाणे -

 फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. अर्जदाराकडे स्वमालकीची कमीत कमी एक हेक्टर जमीन आवश्यक असून योजनेचा लाभ एका व्यक्तीसाठी अधिकतम एक हेक्टरसाठी पात्र असेल. वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी एक हेक्टर क्षेत्राकरिता ७.५ कि. ग्रॅ. शेवगा बियाणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयामार्फत पुरवठा केले जाईल. लाभार्थीस एक हेक्टर करिता रुपये ३० हजार अनुदान देय असून त्यामध्ये रुपये ६ हजार ७५० किंमतीचे बियाणे पुराविण्यात येईल व उर्वरित रुपये २३ हजार २५० मध्ये  सेंद्रिय खते, रासायनिक खते, कीटकनाशके इ. रुपये 5 हजार 250, मशागत खर्च रुपये 12 हजार,  इतर अनुषंगिक किरकोळ खर्च (विद्युत/इंधन खर्च, वाहतूक खर्च इ.) रुपये 6 हजार असे एकूण रुपये 23 हजार 250 या बाबींचा समावेश असेल.  रुपये २३ हजार २५० अनुदानाची रक्कम लाभार्थीस रु..पये ११ हजार ६२५ च्या दोन समान हप्त्यात बँक खात्यात डी.बी. टी. द्वारे जमा करण्यात येईल. अनुदानाचा पहिला हप्ता बियाणाची लागवड केल्यानंतर व दुसरा हप्ता लागवडीनंतर एक वर्षाने देय असेल.

No comments