इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्याविविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ऑफ लाईन पध्दतीने थेट कर्ज योजना, 20 टक्के बीजभांडवल योजना आणि ऑनलाईन पध्दतीने व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिध्दी योजना राबविण्यात येत आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 साठी सर्व योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी व अग्रणी बँक अधिकारी यांच्यामार्फत सर्व संबंधित यंत्रणांना ते पाठविण्यात आले आहे.
ऑफलाईन योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी जातीचा दाखला व आधार कार्ड महामंडळचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, दूरध्वनी क्रमांक 0231-2653512 येथे संपर्क करावा. ऑनलाईन योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाची वेबसाईट www.msobcfde.org वर संबंधित योजनेचा पर्याय निवडून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे
No comments