50 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग
Updated 4 PM
कोल्हापूर, दि. 12 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 132.35 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व शिरगांव, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची,मांगले सावर्डे व चावरे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे, पणुरे व आंबर्डे असे 50 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
No comments