जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग
4 PM
कोल्हापूर, दि. 11 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 127.14 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव व सरुड पाटणे, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव व खोची, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे असे 42 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
No comments