Header Ads

Header ADS

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेश्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा


 

 'बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी  

           कोरोनासह सर्व अडचणी दूर कर'- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

 

बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले

या वारकरी  दांपत्याला महापूजेचा मान

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण

 

 

           सोलापूर /पंढरपूर दि. 10 :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची  परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे  सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठे ही कमी पडणार नसल्याची ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.   समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यसमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठल चरणी घातले.

            आषाढी एकादशी निमित्त श्री.शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी  मानाचे वारकरी मु.पो.  रुईता.गेवराईजि.बीड  येथील मुरली भगवान नवले (52) आणि सौ.जिजाबाई मुरली नवले (47) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची  महापूजा  केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात  ते बोलत होते.

            यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीयमंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्यलोकप्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वर्षी 10 लाखांपेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने  चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरीवारकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणार

 

             राज्यात कृषीउद्योगशिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील, असे त्यांनी सांगितले.

            राज्यात या वर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल.  शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने महापूजा

            राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे.  आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण

 

          आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन  महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधवउपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड  उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे व मान्यवरांच्या हस्ते 'रिंगणया वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील या प्रसंगी करण्यात आले.

 

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

            पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी अभियानामध्ये नागरिकांचा  सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडीपुरस्कार  देण्यात येतो.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह)द्वितीय क्रमांक - वै.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडीमु.पो.शेरातालुका रेणापूरजिल्हा लातूर  (75 हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (50 हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. या वेळी 'ग्रीन बिल्डिंगपुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

            प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री.औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केलेतर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.

              यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदेबंडू जाधवआमदार सर्वश्री दीपक केसरकरतानाजी सावंतदादा भुसेसंजय राठोडशहाजीबापू पाटीलसमाधान आवताडेसचिन कल्याणशेट्टीभरतशेठ गोगावलेरविंद्र फाटकराणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारेजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरपोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेअपर जिल्हाधिकारी संजीव जाधवमंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते

                                      

No comments