सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यस्तरीय संकल्प परिषदेत कोल्हापूरचे कौतुक
कोल्हापूर, दि. 4 : सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी यांची मुंबई येथे "राज्यस्तरीय संकल्प परिषद" कार्यशाळा घेण्यात आली.
सांसद आदर्श ग्राम योजनेत फेज 5 आणि फेज 6 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी हे गाव निवडले असून या गावातील 88 कामे पूर्ण आहेत. सांसद आदर्श ग्राम योजनेच्या अहवाला अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी सांसद आदर्श ग्राम योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी कोल्हापूरच्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच चार्ज ऑफिसर प्रियदर्शनी मोरे यांच्या कामाचे कौतुक करुन सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्राजक्ता साळुंखे-गोळे यांचे अभिनंदन केले.
या कार्यशाळेत राष्ट्रीय ग्रामीण विकास एवं पंचायती राज संस्थानच्या वतीने डॉ. लखनसिंग यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेबद्दल मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे राज्य समन्वयक तथा सांसद आदर्श ग्राम योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, परमेश्वर राऊत, मुख्य परिचालन अधिकारी तसेच एमएसआरएलएमचे उपसंचालक डॉ. राजेश जोगदंड यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
सर्व जिल्हा नियोजन अधिकारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न होऊ शकली.
000000
No comments