*महिलांच्या तक्रारी, अडचणींचे अर्जच लोकशाही दिनी स्वीकारण्यात येणार : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील
*
कोल्हापूर, दि.4 :समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे व पिडित महिलांवर सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून 'महिला लोकशाही दिन' आयोजित करण्यात येतो. यामध्ये महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवून घ्याव्यात. तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरुपाच्या तक्रारींचे अर्ज महिला लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.
जिल्हयामध्ये तालुका स्तरावरील महिला लोकशाही दिन तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यालय ठिकाणी आयोजित करण्यात येतो.
000000
No comments