महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी दिवाळी फेस्टिवलचे आयोजन
कोल्हापूर ता.20 : दिनदयाळ अत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी दिवाळी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. हे फेस्टीवल राजारामपुरी 1लि गल्ली, जनता बझार समोरील राजाराम गार्डन येथे आयोजित करण्यात आले आहे. हे दिवाळी फेस्टिवल शुक्रवार २१ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत असणार आहे. या फेस्टीवलचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या नियंत्रणखाली फेस्टिवल घेण्यात येत आहे. यामध्ये 45 महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव व व्यवसायिकता वाढविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत मागच्या वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ही महिला बचत गटांच्यामार्फत बनवण्यात येणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ व महिलांच्या कौशल्याला वाव मिळण्यासाठी आयोजित केले आहे.
या फेस्टिवलमध्ये आपणास मातीच्या शोभेच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, बांबू व खनापासून बनवलेले आकाश दिवे, पणत्या, शोभेच्या वस्तू, तोरण, हंडक्राफ्ट, फाब्रिक ज्वेलरी, शुभेच्छा बॉक्स, पापडाचे व लोणच्याचे विविध प्रकार, कापडी पिशव्या, झाडू, हळद, विविध प्रकरच्या चटण्या, लोणचे, रोपवाटिका सेंद्रिय खत तसेच खास खवय्यासाठी खाद्य मेजवाणीमध्ये, थालीपीठ, पुरणपोळी, खर्डा भाकरी, खांडोळी, डोसा, पाणीपुरी, स्प्रिंग पोटटो, सोलापुरी भाकरी, चिकन, बिर्याणी, वडा-कोंबडा उपलब्ध असणार आहे. तरी शहरवासियांनी राजारामपुरी 1 ली गल्ली येथील राजाराम हॉल गार्डन येथील बचत गटांच्या दिवाळी फेस्टिवलला भेट देवून आपली दिवाळी खरेदी इथेच करावी व या महिलांच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments