Header Ads

Header ADS

प्रधानमंत्री पिक विमा योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार



कोल्हापूर, दि. 18  :   प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील  रब्बी ज्वारी (जिरायत) गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी लागू आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/बिगर कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुध्दा योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठीही रब्बी ज्वारी 30 नोंव्हेबर, इतर रब्बी पिकासाठी 15 डिसेंबर 2022 तर उन्हाळी भुईमूग 31 मार्च 2023 मुदत आहे. ही योजना राबविण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्ह्यासाठी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि या विमा कंपनीची निवड करण्यात आली असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार  यांनी कळविले आहे.
  योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा/सहमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणा पत्र, बॅक पासबुक प्रत या आवश्यक कागदपत्रांसह खाते कार्यरत असणारी बॅक शाखा/ प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, संबधित विमा कंपनी कार्यालय, आपले सरकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. या शिवाय पिक विमा संकेतस्थळ (www.pmfby.gov.in) यावर ऑनलाईन अर्ज करुन शेतकरी योजनेत सहभागी होवू  शकतात.  
  योजनेतील सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के इतका राहणार असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमाहप्ता खरीप हंगामातील पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के तर नगदी पिकासाठी 5 टक्के इतका आहे. प्रधानमंत्रीपिकविमा योजनेंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी/लावणी न झाल्यामुळे (एकूण पेरणीक्षेत्राच्या 25 टक्क्यापेक्षाकमी पेरणीझाल्यास) होणारे नुकसान तसेच पिकांच्या हंगामा मध्ये (सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत) पूर, पावसातील खंड, दुष्काळ..इ. सारख्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर होणाऱ्या नुकसानी पासून विमा संरक्षण पुरविण्यात येत आहे. याशिवाय पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीजकोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग ..इ. बाबीमुळे उत्पन्नात येणारी घटीमुळे होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात्त (काढणीनंतर 14 दिवसापर्यंत) नुकसान या बाबींसाठीविमा संरक्षण पुरविण्यात येत आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी/कर्मचारी अथवा संबंधित विमाकंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा. पिक नुकसानीची जोखीम पिक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्यदेण्याचेकार्य याÇ योजनेतूनहोत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनीÆ योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. बिराजदार यांनी केले आहे.
  0 0 0 0 0 0

No comments