भूमि अभिलेख विभागातील गट क ची 28 ते 30 नोव्हेंबरला भरती परीक्षा
कोल्हापूर, दि. 18 : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक ०9 डिसेंबर 2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली असून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहीरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे, असे भुमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी कळविले आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांच्या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी .
परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक देखील दिनांक १४ नोव्हेंबर 2022 पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही पत्रकात नमुद आहे.
00 0 0 0 0
No comments