Header Ads

Header ADS

ई-आर-1 विवरणपत्र 31 जानेवारी पर्यंत भरण्याचे आवाहन



 कोल्हापूर, दि. 3  : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र   31 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

 डिसेंबर 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती  (पुरुष/स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम सुरु आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ई-आर रिटर्नची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ पहावे. तसेच दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर अथवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे वरिष्ठ लिपिक श्री. रा. गु. पांढरे यांच्या 9158432640 भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.

00000

No comments