*राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आज उद्घाटन*
कोल्हापूर, दि. 10 : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे दि. 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन बुधवार, दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता कोल्हापूर इस्टिटयुट ऑफ टेक्नोलॉजी (K I.T.), चित्रनगरी, कोल्हापूर येथे प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल आणि प्रसिध्द अभिनेता भरत जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
या सप्ताहा अंतर्गत जनप्रबोधनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शाळा/महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाव्दारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन, रस्ता सुरक्षा विषयी पथनाट्य, इंस्टाग्रामवर रस्ता सुरक्षा विषयक रिल (Reel) स्पर्धा, महिलांसाठी रस्ता सुरक्षा बाईक रॅली, वाहन चालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीरे, पोस्टर्स व बॅनर्स आणि होर्डिंग्ज द्वारे रस्ता सुरक्षा विषयक संदेश प्रदर्शित करणे, विना हेल्मेट, विना सिट बेल्ट व अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांना उपरोधात्मक गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली आहे.
*******
No comments