Header Ads

Header ADS

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर


मुंबई, दि. 28: महाराष्ट्र हे देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरवोद्गार ‘जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले.

  महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या या जडणघडणीचा प्रवास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्याकडून 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सायं 7.30 वाजता महासंचालनालयाच्या पुढील समाज माध्यमांच्या लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.


No comments