कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी सचिन अडसूळ रुजू
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी आज सचिन अडसूळ रुजू झाले.
मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिदाल येथील असणाऱ्या सचिन अडसूळ यांनी यापूर्वी गडचिरोली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी श्री.अडसूळ यांचे स्वागत केले. यावेळी सचिन वाघ, सतीश कोरे, साक्षी मोरे, अनिल यमकर, दामू दाते, स्वप्नाली कुंभार आदी उपस्थित होते.
0000000
No comments