Header Ads

Header ADS

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांनी नोंदणी करावी



कोल्हापूर, दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमातंर्गत मतदारांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन 275 करवीर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुर्नवसन अधिकारी सविता लष्करे यांनी केले आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम खालीलप्रमाणे-
पुनरिक्षण पूर्व उपक्रम- 
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याव्दारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी- शुक्रवार, दि. 21 जुलै 2023 ते सोमवार, दि. 21 ऑगस्ट 2023.
नमुना 1- 8 तयार करणे व 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करणे- शनिवार दि. 30 सप्टेंबर 2023 ते सोमवार दि. 16 ऑक्टोबर 2023.
पुनरिक्षण उपक्रम-
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी- मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2023,
 दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2023 ते गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 2023, 
विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी- मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, 
दावे व हरकती निकाली काढणे- मंगळवार दि. 26 डिसेंबर 2023 पर्यंत, 
अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटा बेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- सोमवार दि. 1 जानेवारी 2024 पर्यंत व अंतिम मतदार यादी प्रसिध्दी-  शुक्रवार दि. 5 जानेवारी 2024 पर्यंत.
         कार्यक्रमात मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार (ERO), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे अवलोकनार्थसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर मतदार यादी आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ किंवा जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या https://kolhapur.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2023  ते गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती (नमुना क्रमांक 06, 06 ब, 07 व 08) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तालुक्यातील तहसिलदार कार्यालय (निवडणूक शाखा) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहे.
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पात्र, तथापि अद्यापही मतदार यादीत नाव सामाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संधी उपलब्ध झाली असून मतदारांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे खालील अर्ज भरुन द्यावेत.
1) नमुना क्रमांक 6 (मतदार यादीत नाव सामाविष्ट करावयासाठी अर्ज)
2) नमुना क्रमांक 7 (मतदार यादीतील नावाची वगळणी करावयासाठी अर्ज)
3) नमुना क्रमांक 08 (मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज)
4) नमुना क्रमांक 06ब (आधारकार्ड मतदान ओळखपत्राशी जोडण्यासाठी करावयाचा अर्ज)
 मतदारांनी आपल्या आवश्यकते प्रमाणे वरील नमुने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तालुक्यातील तहसिलदार कार्यालय (निवडणूक शाखा) यांच्याकडे सादर करावेत किंवा निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या वोटर हेल्पलाईन ॲप या प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. निवडणूक आयोगाच्या वोटर हेल्पलाईन ॲप या प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज सादर करताना मतदारांनी आपली माहिती अचूक नमूद करावी. मतदार यादीत नावाची नोंद असेल तरच निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येतो, अशी माहितीही  275 करवीर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती लष्करे यांनी दिली आहे.
000000

No comments