Header Ads

Header ADS

*संभावित पुरस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्याचे स्थलांतरण


कोल्हापूर, दि. 25 : - जिल्ह्यात पावसाचा जोर कायमच असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणात्याही वेळी पाण्याचा विसर्ग सुरू होवू शकतो. त्यामुळे २०१९ व २०२१ साली ज्यांच्या घरात पूराचे पाणी आले होते त्या नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृहात किंवा आपल्या सोयीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही मागील पुरावेळी पाणी आले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयतील तळमजला तातडीने स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले. यानंतर संबंधित विभागांनी स्थलांतरण प्रक्रिया सुरु केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूरबाधित सर्वच प्रशासकीय यंत्रणांना तातडीने आपली कार्यालये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचे आवाहन केले आहे.

No comments