Header Ads

Header ADS

20 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन


कोल्हापूर, :  डाक अदालत दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतमध्ये कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसल्यास व समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यास अशा तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे प्रवर अधीक्षक ए.व्ही. इंगळे यांनी कळविले आहे.
  विशेषतः टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्यांचे नांव हुद्दा इत्यादी संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर, , ए.व्ही. इंगळे यांच्या नांवे दोन प्रती सह दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.
00000

No comments