Header Ads

Header ADS

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 64 कनेक्शन व 33 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

कोल्हापूर ता.26 :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांच्यामार्फत थकबाकी व अनाधिकृत कनेक्शन धारकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये दि23 ते 26 फेब्रुवारी 2026 अखेर थकबाकी असलेली 64 कनेकशन व 33 अनाधिकृत कनेक्शन खंडीत करुन रोख रक्कम रुपये 5 लाख 61 हजार 420/- इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली. तसेच चेकद्वारे रक्कम 10 लाख 42 हजार 263 इतकी रक्कम वसूल करुन रक्कम रु.16 लाख 03 हजार 683/- इतकी रक्कम जमा झाली आहे. सदरची कारवाई शहरातील लक्षतीर्थ वसाहत, चंबुखडीशिगणापुर, मांतग वसाहतझोपडपट्टी एरिया, भगतसिंग वसाहत, राजारापुरी 7, 8 व वी गल्लीमध्ये, झोपडपटटी एरियागावेशदत्तगल्लीपाडळकर मार्केट परिसर, लक्ष्मीपुरीजय शिवराय चौक, श्रेयश पार्कगजानन महाराजनगरकावळा नाका परिसरसंजय गांधी सोसायटी, गोल्डस जिमताराबाई पार्क इत्यादी भागामध्ये कारवाई करुन कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.

            सदरची कारवाई आयुक्त के.मंजूलक्ष्मीअतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये शाखा अभियंता राजेंद्र हुजरेमयुरी पटवेगारप्रिया पाटीलमहानंदा सुर्यवंशी, सुनिल भाईक, पथक प्रमुख अजित मोहितेमधु कदमअमर बागलसंजय पाटील यांनी केली आहे.

            सदरची मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असून पाणी बिलाची थकीत रक्कम वेळेवर भरणा करावी व नळ कनेक्शन बंद करणेवर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणेमिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

000000000000



No comments