Header Ads

Header ADS

माझं शहर माझी जबाबदारी’ अंतर्गत शुक्रवारी शहरात महास्वच्छता मोहीम

कोल्हापूरता. 26 : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने माझं शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी शहरात व्यापक महास्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून आयोजित या विशेष उपक्रमात महापालिकेचे सर्व पदाधिकारीअधिकारीनगरसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

            सकाळी 7.00 वाजता तावडे हॉटेल येथील शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

            महास्वच्छता मोहिमेत शहरातील प्रमुख मार्गांचा समावेश असून विभागीय कार्यालय क्र. 1 (गांधी मैदान परिसर) : शेंडा पार्क ते इंदिरा सागर हॉलआर.के. नगर नाका ते शेंडा पार्क चौकरंकाळा टॉवर ते तलवार चौकतलवार चौक ते शालिनी पॅलेसतलवार चौक ते चिवा चौक (जुना वाशी नाका).  विभागीय कार्यालय क्र. 2 (छ. शिवाजी मार्केट परिसर) : रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशनदसरा चौक ते उमा टॉकीज ते रेणुका मंदिर चौक ते हॉकी स्टेडियम. विभागीय कार्यालय क्र. 3 (राजारामपुरी परिसर) : छ. शाहू मिल चौक ते केएसबीपी चौक ते टेंबलाई नाकाकावळा नाका ते दाभोळकर कॉर्नर चौक ते दसरा चौक. विभागीय कार्यालय क्र. 4 (छ. ताराराणी मार्केट परिसर) : टेंबलाई नाका ते कावळा नाका ते धैर्यप्रसाद चौकसीपीआर चौक ते कलेक्टर ऑफिस चौक ते धैर्यप्रसाद हॉलतसेच तावडे हॉटेल ते कावळा नाका येथे विभागनिहाय स्वच्छता केली जाणार आहे.    

            या मोहिमेद्वारे रस्तेदुभाजक व फुटपाथ यांची स्वच्छता करण्यात येणार असून रस्त्यावरील साचलेली खरमातीतणकट तसेच फुटपाथवरील अडथळा निर्माण करणारी झाडे-झुडपे हटविण्यात येणार आहेत. या उपक्रमात सुमारे चार हजारांहून अधिक स्वच्छतादूत सहभागी होण्याची शक्यता आहे.

            या महास्वच्छता मोहिमेत निसर्गप्रेमीतालीम मंडळेविविध स्वयंसेवी संस्थाव्यापारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवावाअसे आवाहन महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

000000000000


No comments