जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर यांचे आवाहन.
कोल्हापूर, दि. १ (जिमाका) : सध्याच्या परिस्थितीत इराण आणि इस्रायल मधील युद्धामुळे सर्व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे आखाती देशांमध्ये विमान सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जे नागरिक पर्यटनासाठी किंवा नोकरी व शिक्षणानिमित्त आखाती देशांमध्ये तसेच इस्रायल, इराण, इ. ठिकाणी आहेत त्यांनी कोणतीही भीती बाळगू नये. केंद्र सरकार तसेच राज्य शासन परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील या ठिकाणी अडकून असलेल्या नागरिकांचे कुटुंबियांनी सदर व्यक्तींचे सर्व माहिती सह ( नाव, मोबाईल नंबर, पासपोर्ट, इ) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
टोल फ्री क्रमांक १०७७
दूरध्वनी क्रमांक -
०२३१२६५९२३२
०२३१२६५२९५०
०२३१२६५२९५३
०२३१२६५२९५४
मोबाईल नंबर – ८२७५१२१०७७
No comments