आडुरच्या राजूभाई मुलाणी यांनी दिले १० कोरोणा योध्याना दिड लाखाचे विमा कवच.
प्रथमेश वाडकर : बालिंगा :प्रतिनिधी करवीर तालुक्यातील मौजे आडूर .येथे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणा आजाराने नागरिकांचे जगणं मुश्किल केले आहे. परंतू कोव्हिड काळात जीवाची बाजी लाऊन काम करणारा वर्ग आपणास आजही पहावयास मिळतोय तो म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका डाटा ऑफरेटर होय. अश्याच कोरोणा महामारीत अखंडीत काम करणाऱ्या आडुर गावातील कोरोणा योद्ध्यांचा आडुर गावचे उद्योगपती राजूभाई मुल्लानी यांनी सत्कार केला. तसेच राजूभाई आब्बासो मुल्लाणी .यांनी सर्व कोरोणा योद्ध्याचा इन्शुरन्स उतरून सदरची पॉलिसी कर्मचाऱ्यांना प्रदान केली यामध्ये कोरोणा काळात काम करत असते वेळी काम करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही सोई सुविधा शासनाकडून मिळत नाहीत.तरीपण हे योद्धे प्रामाणिकपणे काम करत आहेत.जीवाची बाजी लाऊन गावाच्या रक्षणासाठी दिवसरात्र राबतात त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करावे या चांगल्या विचाराने प्रेरीत होऊन मुल्लाणी . प्रत्येकी दिड लाख रूपयांचा विमा कवच असलेली कोरोणा कवच पॉलिसी उतरून दिली . यामध्ये ग्रा पं कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनिस आशा स्वयंसेविका व कॉम्पुटर डाटा ऑपरेटर यांचा समावेश आहे .याबाबत कोरोणा योद्ध्यांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी ग्रा पं आडूरचे सरपंच भगवान भोसले. यांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी ग्रामदक्षता समितीतील पोलिस पाटील सरिता पोवार. सुशीला माने .महादेव सुतार. जयवंत चौगले .बाजीराव पाटील .संतोष कांबळे. आदी मान्यवर उपस्थित होते आभार कमल निरूके. यांनी मानले
No comments