कृषी महाविद्यालय येथे 130 व डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीगृह येथे 70 बेडचे कोविड केअर सेंटर उभारणारप्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून सेंटरच्या तयारीची पाहणी
कोल्हापूर ता.01 : शहरामध्ये कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्यावतीने कोरोना सेंटर टप्याटप्याने सुरु केले जात आहेत. सध्या कृषी महाविद्यालय येथे 130 बेडचे कोरोना केअर सेंटर उभा करण्याचे काम अंतीम टप्यात आहे. या कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-शहर अभियंता बाबुराव दबडे उपस्थित होते.
त्याचबरोबर डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीगृह येथेही 70 बेडचे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात लवकरच कृषी महाविद्यालय व डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीगृह येथे 200 बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी महापालिकेच्यावतीने सर्व तयारी पुर्ण करण्यात आले आहे. या दोन्ही सेंटरचे ऑडिट करण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या आहेत. तसेच येथे स्टॉफ नियुक्तीची कारवाई सुरु असून लवकरच हे कोवीड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.
No comments