महापालिकेच्यावतीने दि.16 ते 31 मे अखेर घरोघरी सर्व्हेमधून केलेल्या तपासणीत 652 पॉझिटिव्ह
कोल्हापूर ता.01 : कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. या अंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केद्रामार्फत दि.16 ते 31 मे 2021 अखेर संजीवनी अभियाना व्यतिरिक्त घरोघरी सर्व्हेमधून केलेल्या तपासणीत 652 नागरीक पॉझिटिव्ह आढळून आले. यावेळी 13030 नागरीकांची घेरोघरी सर्व्हेदरम्यान तपासणी करण्यात आली. या सर्व्हेमध्ये 1471 नागरीकांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 125 नागरीक पॉझिटिव्ह आढळून आले. तर 11559 नागरीकांची आरटीपीसीआरद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये 527 पॉझिटिव्ह आढळून आले. तर 9129 निगेटिव्ह आले. 1903 नागरीकांचा आरटीपीसीआर अहवाल प्रलंबित आहे.
महापालिकेने 16 ते 31 मे अखेर संजीवनी अभियान व घरोघरी केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये 32186 नागरीकाच्या ॲन्टीजन टेस्ट व आरटीपीसीआरद्वारे घेण्यात आले यामध्ये 1257 नागरीकांचे अहवाल पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. तर 4784 नागरीकांचा अहवाल प्रलंबीत आहे.
No comments