Header Ads

Header ADS

“माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” अभियानाअंतर्गत तपासणीच्या ठिकाणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेटया अभियानाअंतर्गत 136 कुटूंबाची तपासणी 6 पॉझिटिव्ह



कोल्हापूर ता.06 : शहरामध्ये रविवारी संजीवनी अभियानाअंतर्गत माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात आले. पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. महापालिका 18 वर्षाखालील व्याधीग्रस्त बालकांचा सर्व्हे करुन त्यांची 6 मिनिटे वॉक टेस्ट घेत आहेत. यामध्ये शहरातील 136 व्याधीग्रस्त असलेल्या बालकांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या दरम्यान प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सदरबाजार व कसबा बावडा या ठिकाणी असलेल्या व्याधीग्रस्त कुटुंबाच्या तपासणी वेळी भेट दिली. यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे व वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. तसेच उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांनी बाजार गेट, जोशी गल्ली, कुंभार गल्ली याठिकाणी तपासणी दरम्यान भेट दिली. यावेळी उपशहर अभियंता नारायण भोसले व वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने शहरातील 483 व्याधीग्रस्त बालकांची यादी तयार केली आहे. या यादीमधील व्याधीग्रस्त (Comorbid) बालक असलेल्या कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे. व्याधीग्रस्त बालकाच्या कुटुंबातील व्यक्तींची 6 मिनिट वॉक टेस्ट घेऊन आलेल्या निष्कर्षानुसार कोविड टेस्ट, उपचार व संदर्भ सेवा देण्यात येत आहेत.

             या अभियानाअंतर्गत रविवारी व्याधीग्रस्त बालकांच्या कुटुंबातील 644 नागरीकांची 11 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये 136  कुटुंबातील 644 बालकांसह नागरीकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये 143 नागरीकांची ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये 6 पॉझिटिव्ह आढळून आले तर 137 जण निगेटिव्ह आले. तसेच 182 नागरीकांची आरटीपीसीआरची तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भागामध्ये 43 वैद्यकिय पथकाद्वारे व्याधीग्रस्त बालकांच्या घरातील व्यक्तिंची तपासणी करण्यात आली.

No comments