जन्म नोंदणीमध्ये नोंदणी दिनांकापासून 15 वर्षापर्यंत बाळाच्या नावाची नोंद करता येणार
कोल्हापूर ता.09 : जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम 1969 चे कलम 14 व महाराष्ट्र जन्म मृत्यु नोंदणी नियम 2000, नियम क्र. 10 नुसार जन्म नोंदणीमध्ये नोंदणी दिनांकापासून 15 वर्षापर्यंत बाळाच्या नावाची नोंद करण्याची तरतूद आहे. राज्य शासनाने अधिसूचना क्र.115, जमृनों-2020/724/प्र.क्र.326/कु
ज्या नागरीकांच्या मुलांच्या जन्माची नावाशिवाय नोंदणी दि. 1 जानेवारी 2000 पूर्वी झालेली आहे व ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षे कालावधी पुर्ण झालेला आहे अशा सर्व नागरीकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर नावे जन्म रजिस्टरमध्ये नोंदणीकरीता बाळाचे नाव समाविष्ट करणेबाबतचा अर्ज महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात उपलब्ध आहे. नावाची नोंदणी करताना नावाचा एक शासकीय पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, एस.एस.सी. प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड या कागदपत्रांच्या प्रति अर्जासोबत सादर कराव्या लागणार आहे. जन्म नोंदणीच्या वेळेस अर्जदाराने ठेवलेले नाव बदलता येणार नाही. सदर नाव नोंदणीची मुदत फक्त दि. 27 एप्रिल 2026 पर्यंतच आहे. तद्नंतर नाव समाविष्ट करण्याचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन निबंधक जन्म मृत्यु विभागामार्फत करण्यात येत आहे.
No comments