*जागतिक दूध दिनानिमित्त शिरोली दुमाला येथे दूध उत्पादकांना मास्क व सॅनी टायझर वाटप
दूध उत्पादकांना मास्क व सॅनी टायझर वाटप करताना गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील, वीरर्शैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे,शाहू छत्रपती दूध संस्थेचे चेअरमन सचिन विश्वासराव पाटील, व्हा.चेअरमन संजय सदाशिव पाटील, सुपरवायझर के वाय पाटील व आदी.
प्रथमेश वाडकर/बालिंगा प्रतिनिधी . करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे जागतिक दूध दिना निमित्त दूध उत्पादकांना मास्क व सॅनिटायझर गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शाहू छत्रपती दूध संस्था शिरोली दुमाला या संस्थेने वेळोवेळी सभासदांच्या व उत्पादकांच्या बाबतीत नवनवीन सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिवाळी बोनस व भेटवस्तू, जनावरांच्या आरोग्यासाठी डॉक्टर्स, त्यांना लागणारा औषधोपचार आदी अनेक सेवा व उत्पादकांचे हित जपले आहे. कोरोना महामारी मुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. जागतिक दूध दिनानिमित्त आपल्या संस्थेच्या सभासदांनी काळजी घेणे गरजेचे असल्याने त्यांना मास्क व सॅनी टायझर देऊन जागतिक दूध दिन साजरा केला. यावेळी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या प्रगतीला दूध उत्पादक हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. शाहू छत्रपती दूध संस्थेने दूध उत्पादकांच्या काळजीसाठी योग्य निर्णय घेतला आहे. व ही काळाची गरज आहे असे गौरवोद्गार काढले. त्याप्रसंगी शाहू छत्रपती दूध संस्थेचे चेअरमन सचिन विश्वासराव पाटील(भैय्या), तुकाराम नारायण पाटील (अण्णा), शाहू छत्रपती दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय सदाशिव पाटील, वीरर्शैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे,सुपरवायझर के वाय पाटील, संजय पाटील, सागर कारंडे ,सर्व दूध उत्पादक, सदस्य आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत वीरर्शैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे व आभार दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय पाटील यांनी केले.
No comments