शहरात 371 नागरीकांचे लसीकरण60 वर्षावरील कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचा 325 नागरीकांना पहिला व 46 नागरीकांना दुसरा डोस
कोल्हापूर ता.06 : शहरामध्ये रविवारी 5 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पीटलमध्ये 60 वर्षावरील 325 नागरीकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस व 46 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला. शहरामध्ये पहिला व दुसरा डोस मिळून 371 नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई येथे 83, राजारामपूरी येथे 90, पंचगंगा येथे 22, महाडीक माळ येथे 10, आयसोलेशन येथे 8 व सीपीआर हॉस्पीटल येथे 158 इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 118976 इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर 41323 इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. आज अखेर 45 वर्षावरील 51 टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांनी कोव्हिशिल्डच्या दुस-या डोस घेण्यासाठी ज्यांचे 84 दिवस पुर्ण झालेले आहेत अशा नागरीकांनी दि.7 जून 2021 रोजी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे. याकरीता पात्र लाभार्थींना संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन कोव्हिशिल्डच्या दुस-या डोससाठी फोन येईल त्यांनीच संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे. तसेच शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यां विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे रविवार दि.7 जून 2021 रोजी सकाळी 09:00 वाजता लसीकरण आयोजित केले असून ज्या विद्यार्थीनी कोविड लसीकरण करुन घेण्यासाठी आपले नाव नोंदणी केली आहे त्यांनी लसीकरणासाठी वेळेत उपस्थित राहणेचे आहे.
No comments