Header Ads

Header ADS

*पावसाळ्यापुर्वी रस्त्याचे मजबुती करण करणार :-सरपंच मयूर जांभळे*.



प्रथमेश वाडकर : बालिंगा :प्रतिनिधी.
    बालिंगा (  ता. करवीर ) येथील  बालिंगा - रिंगरोड जाणाऱ्या बायपास   रस्त्यावर ओढ्यानजीक मोठं मोठे खडे पडल्याने दरवर्षी  रस्त्यावर पाणी साठून निसरट होऊन अपघात होत होते. यासाठी शेतकरी वर्गातून  व प्रवाशी वर्गातून  पावसाळ्यापूर्वी खड्डे मुजउन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे वारंवार केली जातं होती.बालिंगा, पाडळी खुर्द, व  नागदेववाडी गावातील शेतकऱ्यांची शेती या परिसरात आहे.याची दखल घेऊन बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मयूर मधुकर जांभळे. यांनी तात्काळ ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश देऊन  बालिंगा ते जिल्हा परिषद कॉलनी रोडवर ओढ्यानजीक मुरूम ओढून जेसीबीच्या साहाय्याने मुरूम पसरणी करून होणारे अपघात व निसरट यातून सर्वांची सुटका करण्यातआली. ग्रामपंचायतीची विकास कामातील तप्तरता, काम करण्याची पद्धत पाहुन शेतकरी वर्गासह प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.सरपंच यांच्या मनात जनतेसाठी असणारी काम करण्याची तळमळ सकारात्मक दृष्टीकोन या निमित्ताने पुन्हा एकदा   चर्चेत आला आहे.
यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे सरपंच मयूर जांभळे यांनी सांगितले.

No comments