Header Ads

Header ADS

अंगणवाडीचा स्मार्ट अंगणवाडीत  समावेश 

 

बालिंगा । प्रतिनिधी: करवीर तालुक्यातील शिंदेवाडी. येथील अंगणवाडीचा राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे स्मार्ट अंगणवाडीत समावेश केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील शंभर स्मार्ट अंगणवाडीचा समावेश केला आहे.
  सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ग्रामीण भागातील पूर्व प्राथमिक शिक्षण स्मार्ट होण्यासाठी शासनाने ही योजना अमलात आणली आहे . या अंतर्गत या अंगणवाडीस स्मार्ट किट दिले आहे. या किटमध्ये १२८ वस्तूंचा समावेश आहे.त्यामध्ये स्मार्ट टीव्ही, ई लर्निंग सिस्टीम,शैक्षणिक पेंटिंग ,सोलर लाईट सिस्टीम,स्वच्छ भारत  किट,वीजविरहित पाणी शुद्धीकरण यंत्र , हॅन्ड वॉश बेसिन आदी सुविधांचा समावेश आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ व करवीर महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एन.एस. कांबळे यांनी शिंदेवाडी येथील अंगणवाडी स्मार्ट होण्यासाठी पर्यवेक्षिका अनुपमा सुतार ,ग्रामस्त, तसेच अंगणवाडी सेविका,आशा सेविका व सर्व सदस्य यांनी केलेल्या सहकार्य व कामाचे कौतुक केले.यावेळी राज्यात व जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेल्या आशा सेविका सौ. पूजा पृथ्वीराज शिंदे यांचा सत्कार पंचायत समिती सदस्या सौ.यशोदा पाटील ,सरपंच रंजना पाटील,ग्रामसेविका सौ.एस.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.उपसरपंच संदीप शिंदे यांनी स्मार्ट अंगणवाडी 
करण्याबरोबरच स्मार्ट गाव होण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले .
कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य सागर पाटील, रेखा सुतार  जयश्री शिंदे,बळवंत पाटील, मेघा पाटील, प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक ,शिक्षक , अंगणवाडी सेविका , मदतनीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
              फोटो ओळ.
शिंदेवाडी : येथील ग्रामपंचायत अंगणवाडीला  साहित्य प्रदान आणि सत्कार करताना यशोदा पाटील, एन. एस. कांबळे. अनुपमा सुतार. सरपंच रंजना पाटील, उपसरपंच संदीप शिंदे, ग्रामसेविका एस. एस. पाटील.

No comments