Header Ads

Header ADS

कोविडच्या गंभीर रुग्णांवरील उपचाराकरीता ग्रामिण रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध - खासदार मंडलिक

 

कोल्हापूर दि.08 :-       सध्या कोविडची दुसरी लाट सर्वत्र सुरु असून अशा गंभीर रुग्णांकरीता तातडीने उपचार व्हावेत याकरीता शिवसेना पक्षाकडून एकूण वीस व्हेंटिलेटर कोल्हापूर जिल्ह्याकरीता देण्यात आले.  आजरोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. उदय सामंत यांचे हस्ते हे व्हेंटिलेटर मान. जिल्हाधिकारी यांचेकडे सुपुर्द करणेत आले.

            दरम्यान, ग्रामिण भागातील गंभीर रुग्ण कोल्हापूरात येई तोपर्यंत वेळ वाया जात असल्याकारणाने रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते.  या रुग्णांना त्यांच्या गावाशेजारील उपजिल्हा रुग्णालय अथवा ग्रामिण रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागासह व्हेंटिलेटर उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांचा मृत्यूदर कमी होणार असल्याकारणाने याठिकाणी व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी नाम. उदय सामंत यांचेकडे निवेदनाव्दारे केली असता छत्रपती प्रमिलाराजे सर्वोतोपरी रुग्णालयाकरीता 4, चंदगड, कागल, राधानगरी-भुदरगड व करवीर तालुक्यांकरीता प्रत्येकी दोन तर गगनबावडा तालुक्याकरीता एक व्हेंटिलेटर आजरोजी उपलब्ध करुन दिल्याने कोल्हापूर शहरावर होणारा अतिरिक्त ताण हा कमी होवून गंभीर रुग्णांवर त्यांच्या गावाशेजारील दवाखान्यांमध्ये तातडीने उपचार होणार असल्याकारणाने रुग्ण मृत्यू दरात नक्कीच फरक पडणार आहे. 

No comments