Header Ads

Header ADS

मान्सून पुर्व तयारीचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून आढावा





कोल्हापूर ता.08 : मान्सून 2021 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा सोमवारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात संबंधीत अधिकारी यांची बैठक झाली.

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनेचा आराखडा सादर केला. यानंतर आरोग्य, पवडी, अग्निशमन, आरोग्य या विभागानी केलेल्या पुर्वतयारीची माहिती घेतली.

            प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी उपशहर अभियंता यांना विभागीय कार्यालय अंतर्गत चॅनेलची सफाई पुर्ण झाली का याची खात्री करावी. धोकादायक इमारतीवर काय कारवाई केली, किती इमारती उतरवल्या, स्टक्चरल ऑडिट किती इमारतींचे केले, किती दुरुस्त केल्या याची माहिती दोन दिवसात देण्याच्या सुचना शहर अभियंता यांना केल्या. पूर बाधीत क्षेत्रातील नागरीकांना कोरोनाचे नियम पाळून स्थलांतरीत करण्याचे नियोजन करा. यासाठी आत्ताच आणखीन शाळा किंवा हॉल निवाऱ्यासाठी वाढवा. शहरातील धोकादायक झाडे, पोल पावसाळयापुर्वी उतरवून घेण्याची दक्षता उद्यान व विद्युत विभागाने घ्यावी. अमृत योजनेअंतर्गत रिस्टोलेशनचे काम तातडीने पुर्ण करुन घेण्याच्या सुचना जल अभियंता यांना दिल्या. पूर बाधीत क्षेत्रातील वाहने पार्किंग करणेसाठी व जनावरे ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील ओपन स्पेसवर दोन ठिकाणी नियोजन करावे. ज्याठिकाणी नाले सफाई झालेली आहे अशा ठिकाणी पहिल्या मोठया पावसाने पुन्हा गाळ भरला असेल तर त्याठिकाणी पुन्हा चॅनेल साफ करुन घेण्याच्या सुचना मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिल्या.   

            विभागीय कार्यालय 1 ते 4 अंतर्गत 170 धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारतींना नोटीसा लागू करुन कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केलेली आहे. यापैकी  पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या 50, दुरुस्त केलेल्या इमारती 8 तर कोर्ट केस दाखल झालेल्या 27 इमारती आहेत. कुळमालकाचा वाद असलेल्या व उतरविणे बाकी असलेल्या 85 इमारती आहेत. यामध्ये यदा कदाचित काही धोका घडलेस त्या इमारतीमधील मिळकत धारकांची जबाबदारी असलेचे शहर अभियंता यांनी सांगितले.

           मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तकालीन परिस्थीचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. त्याचबरोबर शहर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये प्रशासक पदसिध्द अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त सह अध्यक्ष, उप-आयुक्त-1 उपाध्यक्ष, उप-आयुक्त-2 सह उपाध्यक्ष, उप-आयुक्त-3, सहा.आयुक्त 1,2,3, शहर अभियंता, आरोग्याधिकारी, जल अभियंता, मुख्य अग्निशनम अधिकारी, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष सदस्य व जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असल्याचे सांगितले.   

            यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, जल अभियंता अजय साळोंखे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, प्रशासन अधिकारी शंकर यादव, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता मिरा नगीमे आदी उपस्थित होते.

No comments