Header Ads

Header ADS

ना कोरोनाची ना मरणाची भीती कचऱ्यातूनच मिळते जीवनाला गती*......




प्रथमेश वाडकर :बालिंगा :प्रतिनिधी. गोसावी समाजातील पुरुष मंडळी छत्री  दुरुस्ती करणे, खेकडी पकडून त्यावर  उदर निर्वाह करताना पाहतोय  तर  या समाजातील प्रामुख्याने महिला वर्ग आजही आपणाला गावोगावी जाऊन  गावातून गोळा करून गावाबाहेर टाकलेल्या कचऱ्यातून प्लास्टिक, लोखंड, पत्रा, आदी  शोधताना दिसतात. या वस्तू काढून त्याच ओझं दोन दोन किलोमीटर डोक्यावर घेऊन चालत चालत त्या भंगार विकत घेणाऱ्याचे दुकान गाठतात. वस्तू विकत घेणारा दुकानदार  किती दर द्यायच्या तो ठरवतो. तो ठरविलं तो दर मान्य करून रक्कम घेऊन घरी परतायच घरी येऊन  त्यावरचं घरचा संसाराचा गाडा हाकायचा हा नित्यक्रम आपण नेहमी उघड्या डोळ्यांनी पाहतोय. सकाळी पहाटे पाच वाजता जाणारा समाज दुपार पर्यंत घरी परतांना दिसतोय. पण गेली दोन वर्षे कोरोना आजाराने सगळीकडेचं धुमाकूळ घातला असल्याने या  समाजाला संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे.गावोगावी जाण बंद झालंय, खेकडी विकायचा व्यवसाय बंद झालाआहे.त्यामुळे या गोसावी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. पहाटे पाच वाजता उठून टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी पायी पायी चालत जाऊन गावोगावी फिरून  प्लास्टिक, लोखंड, पत्रा आदी  वस्तू  गोळा करायच्या खरंतर ज्या कचऱ्याजवळ जाण तर सोडाच पण या कचऱ्याच्या ढिगाऱ्या जवळून गेलं तरी जीव गुदमरून कासावीस होतो. परंतु या गोसावी समाजाला जीवआणि आपला संसाराचा गाडा चालविण्यासाठी हाच एकमेव पर्याय उरला आहे. ज्या कचऱ्यात घरातील शिळ्या अन्नापासून ते खराब झालेली कपडे तसेच मयत झालेल्या लोकांची अंथरून सुद्धा या कचऱ्याच्या ढिगात पहावयास मिळते. तसेच या कचऱ्याच्या ठिकाणी असणारी भटकी कुत्री यांच्याशी नेहमीच सामना करत या समाजाला आपल्या उदर निर्वाहासाठी कचऱ्यातून जीवन जगण्यासाठी अर्थ शोधण्याशिवाय पर्याय नाही. या बाबत गोसावी समाजातील व्यक्तीशी भेट घेऊन चर्चा केली असता ते म्हणाले काही वर्षांपूर्वी आमचा समाजातील मुलं सकाळी सकाळी गावात जाऊन लोकांच्या घरातील रात्री उरलेलं शिळपाक अन्न  गोळा करून आणायचे परंतु आता काळ बदलला आहे. आमची मुलं सुद्धा आता कमवती झाली आहेत. परंतु संपूर्ण राज्यावर आलेलं हे कोरोनाचं संकट यामुळे आमचा समाजच काय सर्वच घटकांना याची झळ पोहचली आहे. असं सांगून कोणाशीही वैर न धरता शासनाचे सर्व नियम पाळून शोशल डिस्टंन्स पाळून गावातून गावाबाहेर टाकलेल्या कचऱ्यातून  पोटाची खळगी भरतील एवढी  वस्तूची रोज जमवाजमव करून  ना कोरोना ना जीवाची पर्वा न करता संसाराचा गाडा हाकतोय असं त्या प्रामाणिक कचरावेचक पुरुष व महिला वर्गाने सांगून या कचरावेचक समाजासाठी किमान संसारउपयोगी  गरज भागविण्यासाठी अन्नधान्यांची मदत करावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली.

No comments