राशिवडे सरपंचाचा नादच खुळा कोरोणा पेशंटच्या काळजीपोटी शाळेतच गेले वस्तीला
प्रथमेश वाडकर : बालिंगा :प्रतिनिधी.
जवळपास दहा हजाराच्यावर लोकसंख्या असलेले राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठ गाव राशिवडे या गावातील लोकनियुक्त सरपंच krushanat शिवाजी पोवार. हे गावच्या नूतन सरपंचपदी सन २०१७ मध्ये निवडून आले. त्यांचा पिंडच समाजसेवा करण्याचा राधानगरी तालुक्यात सर्प मित्र म्हणून ओळख आहे.आतापर्यंत १० हजाराच्या वर सापांना जीवदान देण्याच काम केले आहे.याची पोच पावती म्हणून सामाजिक वनीकरण व वनविभाग यांनी ५००० रक्कमेची सर्प पकडण्याची काठी बक्षीस म्हणून दिली आहे.पण एवढयावरच सरपंच थांबले नाहीत. सध्या कोरोणाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. याची जाणीव ठेऊन आपण गावचे प्रथम नागरिक आहोत. आणि आपली जबाबदारी आहे. या गावात 45 ते 60 वयोगटातील लोकसंख्या 3862 इतकी असून त्यापैकी 3393 लोकांना लसीकरणास प्रवृत्त करून घेऊन 87 % लसीकरण करण्यात बाजी मारली आहे. 18 ते 44 लोकांचे लसीकरण पूर्ण करून गाव 100 % लसीकरण करण्याचा त्यांचा मनोदय आहे.गावात औषध फवारणी, घर टू घर सर्वे पूर्ण केला आहे. सरपंचांनी शासनाचा आदेश पाळून 10 बेडचे संस्थात्मक अलगीकरण कक्ष प्राथमिक शाळेत सुरू केला आहे. आता जबाबदारी त्या शाळेत असणाऱ्या कोरोणा पेशंटची कोणी घ्यायची पण हा कोव्हिड योद्धा डगमगला नाही. हि सर्व जबाबदारी त्यांनी आपल्यावर घेतली.एरवी घरात गादीवर झोपणारा सरपंच चक्क मराठी शाळेच्या खोली बाहेर फक्त आणि फक्त गावातील आपल्या नागरिकांच्या काळजीपोटी दोन दिवस वस्तीला राहिले. खरोखरच सगळ्याच गावांना असा आदर्शवत सरपंच लाभला तर गावात कोणतीही रोगराई वास करणार नाही. तर गावात कोरोणा आजार शिरकाव करणार नाही .एकंदरीत या राशिवडे गावचे आदर्श सरपंच यांच्या आदर्श कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेऊन मान सन्मान करावा .त्यामुळे पून्हा एकदा नव्या उमिदिन काम करण्याची ऊर्जा मिळेल. हाच आदर्श जिल्ह्यातील सर्व सरपंचानी घेऊन कार्य केल्यास कोरोणा आजार समूळ नष्ट होण्यासवेळ लागणार नाही.
नाद करायचा नाही पोवार साहेब
ReplyDeleteनाद करायचा नाही पोवार साहेब✌️
ReplyDeleteGood job...Sarpanchsaheb
ReplyDelete