Header Ads

Header ADS

भावभक्तीचा ठेवा जपणार गाव सावर्डे दुमाला*.*95 व्या वर्षी वारकरी गुंडू नलवडे यांचा सत्कार

प्रथमेश वाडकर : प्रतिनिधी :-- करवीर तालुक्याच्या पश्चिमेस  सर्व गुण संपन्न असलेलं आणि  कोल्हापूर पासून अवघ्या २१  किलोमीटर अंतरावर वसलेलं सावर्डे दुमाला गाव.या गावामध्ये 95 % लोक वारकरी संप्रदायातील  आहेत.या गावात ह. भ. प. गुरुवर्य कै. आप्पासो वास्कर. महाराज यांच्या प्रेरणेने अनेक वर्षे विठ्ठल मंदिरात विट्टल नामाचा गजर  घुमतो आहे.

या  गावची ग्रामदेवता भावेश्वरी,  विठ्ठल मंदिर. गणेश मंदिर, रामलिंग मंदिर, दत्त मंदिर,मरगुबाई मंदिर, थळोबा देवस्थान, गैबी देवस्थान,महादेव मंदिर आदी देवदेवतांच्या छत्र छायेखाली गावाची वाटचाल सुरु आहे.

 वय वर्षे 95 असताना सुद्धा हरिपाठ, कीर्तन, भजन सुरु होऊन संपेपर्यंत सहभागी होणारे वारकरी गुंडू  नलवडे. हे जेष्ठ नागरिक आजही त्याच उमेदिने पूर्वी प्रमाणे नियमितपणे  विना घेऊन पांडुरंगाची अविरत सेवा करतात आणि करीत आहेत.कोरोना काळातही त्यांनी सेवेत खंड केला नाही.

अशा जेष्ठ वारकरी गुंडू नलवडे यांचा सत्कार करण्याचा निर्णय करवीरचे माजी सभापती पैलवान पांडुरंग पाटील यांनी घेतला. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व कांचनवाडीचे  भिकाजी भोसले . यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ देऊन विट्टलाच्या साक्षीने विठ्ठल मंदिरात त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

 या सत्कार प्रसंगी शंकर निकम, भिकाजीं सुर्वे,आनंदा भोसले, रघुनाथ कारंडे, नानासो कारंडे, पिराजी मोहिते,भिकाजी कांबळे, मदन कारंडे, पांडुरंग कारंडे. आदिसह वारकरी उपस्थित होते.

No comments