पूर ओसरलेल्या भागात महानगरपालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता मोहिमपूराचे पाणी ओसलेल्या भागातून 840 टन कचरा गोळा
कोल्हापूर ता.01 :- कोल्हापूर शहरात पूराचे पाणी ओसरत असून पूर आलेल्या भागात आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पुराचे पाणी कमी झालेल्या भागाची स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर राबविण्यात आली. आज सकाळी 6.30 वाजल्यापासून ही स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली. ही स्वच्छता मोहिम सकाळच्या व दुपारच्या दोन सत्रात राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 840 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला.
शहरामध्ये पूराचे पाणी ओसरु लागलेने महापालिकेच्यावतीने पूराचे पाणी कमी झालेल्या भागामध्ये महास्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता मोहिमेचा 118 वा रविवार असून या अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली.
या स्वच्छता मोहिमेत रिलायन्स मॉल्स मागील बाजू, डिगे पॅसेज, पंचगंगा रोड, गायकवाड वाडा परिसर, पिकनिक पाँईट परिसर, पंचगंगा घाट परिसर, राजाराम तलाव, ताराबाई पार्क परिसर, शाहूपूरी 1,2,3,4,5 वी गल्ली, व्यापारी पेठ, हिंद पार्क, कसबा बावडा, नागाळा पार्क, काटेमळा, खानविलकर पंप ते महावीर कॉलेज मेनरोड, बेडेकर मळा, इंगवले मळा, बापट कँम्प परिसर, जाधववाडी, लोणार वसाहत, कदमवाडी परिसर, मुक्त सैनिक वसाहत, कारंडेमळा या परिसरातील पुराचे ओसलेल्या पाण्याच्या ठिकाणी करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत 7 जेसीबी, 10 डंपर, 2 आरसी गाडया, 4 औषध फवारणी पंप व 26 ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करण्यात आला. सदरची मोहिम महापालिकेच्या 570 सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबविण्यात आली. यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील, शिवाजी शिंदे, महेश भोसले, शुभांगी पोवार, करण लाटवडे, मनोज लोट, विकास भोसले, ऋषीकेश सरनाईक, श्रीराज होळकर, मुनीर फरास व कर्मचारी उपस्थित होते.
No comments