Header Ads

Header ADS

*राजू भाऊंच समाजसेवेतील कार्य कौतुकास्पद.*

प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी :-करवीर तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये महापूराचा जास्तीत  जास्त फटका बसला आहे. मग त्यामध्ये 
शेती असो वा घरे यांचंही जास्त नुकसान झालं आहे.सर्वत्र महापुराच पाणी रोडवरून थोडं खाली गेल्यानं व चार ते पाच दिवस पूर कायम राहिल्यानं रस्त्यावर चिखलाचा अक्षरशः थर साचला आहे.प्रवाशी घराकडे जायच्या ओढीने दुचाकी वरून जाताना चिखलामुळं गाडी स्लिप होऊन अपघात होतील यासाठी खबरदारी घ्यायला हवी अशी भावना राजू सूर्यवंशी यांच्या मनाला स्पर्श करून गेली. अन भाऊंनी लगेचच पुराचं  पाणी उतरलंय याची खात्री करून रोडवरील लाल मातीचा चिखल  तात्काळ साफ करण्याचा निर्णय घेऊन त्याची आज सुरुवात केली.
आज सावरवाडी ते आरे रोडवर गाडी स्लिप होतं होती ह्याची प्रचिती आल्याने त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती. यावेळी करवीरचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राजू सूर्यवंशी (भाऊंच्या ) कार्य तत्परतेनं व युवकांच्या सोबतीनं सावरवाडी ते आरे रोडवरील संपुर्ण गाळ धुऊन काढुन रस्ता स्वच्छ केला.
       यावेळी भैय्या पाटील ,आकाश खोत,मनोहर कंदले,जयदिप कंदले,बाळु खोत,अजिंक्य दिवसे आदेश भाडेकर  गांडेगोंडवाडी मा.उपसरपंच मा. विवेक मिठारी ह्या सर्वांनी आदर्शवत कार्याला हातभार लावून आपली  सामाजिक बांधिलकी        जोपासली.राजू सूर्यवंशी यांच्या आदर्शवत कार्याचं पंचक्रोशीत कौतुक होतं आहे.

No comments