Header Ads

Header ADS

*महापूराच्या काळात विहीरीचे विनामूल्य पाणी देऊन सूर्यवंशी परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी*

-


वाकरे: येथीलg सुर्यवंशी परिवार गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना

बालिंगा ।प्रतिनिधी :-
वाकरे (ता.करवीर) येथील सुर्यवंशी परिवाराने वाकरे परिसरातील कांही गावांना महापुराच्या काळात आपल्या विहिरीचे पाणी विनामूल्य देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
           महापुराच्या काळात सलग आठवठाभर वाकरे परिसरातील विद्युत पुरवठा बंद असल्याने अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची सोय होत नव्हती. पण वाकरे गावातील सुर्यवंशी परिवाराने त्यांच्या घराशेजारील विहीरीतील पाणी परिसरातील अनेक गावातील लोकांना मोफत उपलब्ध करून दिले.विशेष म्हणजे विद्युत पुरवठा बंद असताना जुन्या इंजिनद्वारे स्वखर्चाने डिझेल टाकुन पाणी उपलब्ध केले.पाणी नेणारे टँकर व वाहनांना ये - जा करण्यासाठी व्यवस्थित सोय,टँकर व टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी पाईप व व्हाॅल्वची सोय करून दिली.वाकरे गावातील ग्रामस्थांना सुर्यवंशी परिवारामुळे गेल्या तीन वर्षांत महापुरात पाण्याची अडचण आली नाही.त्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.


No comments