विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू
बालिंगा येथील घटना
बालिंगा :प्रतिनिधी :- येथील गौरव अशोक जांभळे. यांच्या मालकीचे स्वामी समर्थ या नावाने सर्व्हिसिंग सेंटर कोल्हापूर गगन बावडा रोडवर इसार पेट्रोल पंपासमोर गेली दोन वर्षे सुरु आहे. गौरव जांभळे. हा गाड्या सर्व्हिसिंगच काम करत होता. नेहमी प्रमाणे आज सकाळी गौरव अशोक जांभळे( वय 20) हा गाडी सर्व्हिसिंग करीत असताना त्याला विजेचा धक्का लागून त्याचा दुर्दैवी अंत झाला.गौरव याला विजेचा धक्का लागताच पुढील उपचारासाठी सी. पी. आर. कोल्हापूर येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीचं त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी घोषित केले. गौरव हा मनमिळाऊ स्वभावाचा होता त्याच्या अपघाती मृत्यूनं सम्पूर्ण बालिंगा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
No comments