Header Ads

Header ADS

महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन डी. एन. ई.136 च्या मागणीला यश जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार


बालिंगा / प्रतिनिधी :- राष्ट्रीय सणाच्या  ( 15ऑगस्ट,26जानेवारी ,मे,2ऑकटोबर ) या दिवशी ग्रामसभा नको या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी होणेबाबत लक्षवेध निवेदन  अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास व पंचायत राज बांधकाम भवन, मुंबई. यांना दि.13/08/2021 रोजी राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिले होते तर आज निवासी उप जिल्हाधिकारी यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.यासोबत 12 ऑगस्ट 2021 चे पत्र, अधिनियम कलम 7 ची प्रत, ग्रामसभा निर्णय 27/04/2018 आदी कागद पत्रे जोडून दिले होते. शासनाने याचा सारासार विचार करून कोरोना आजार याची माहिती घेऊन 15 ऑगस्टची गावसभा रद्द करून गावसभा घ्यायची असेल तर ती ऑनलाईन घ्यावी असे आदेश ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ  यांनी दिले. महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन डी . एन. ई.136 च्या मागणीला यश मिळाले अशी माहिती ग्रामसेवक युनियन डी. एन. ई.136 कोल्हापूर जिल्हा शाखा चे जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार. मानद अध्यक्ष गौतम कांबळे.यांनी दिली.
       यावेळी उपाध्यक्ष आनंदा तळेकर, एकनाथ चौगले, सुनील सुतार,चंद्रकांत सूर्यवंशी, शिवाजी वाडकर, निलेश कुंभार, प्रवीण खराळकर, पी. जी. पाटील. आदी उपस्थित होते.

No comments